loader
Breaking News
Breaking News
Foto

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचा ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला; 10 जवान शहीद

दोडा. जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील भदरवाह उपविभागातील थानाला येथे लष्कराचे वाहन खोल दरीत कोसळल्याने दहा जवान शहीद झाले आणि सात जण जखमी झाले. जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यात गुरुवारी एका लष्करी वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळल्याने दहा जवानांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. भदरवाह-चंबा आंतरराज्य रस्त्यावर खन्नी टॉप येथे हा अपघात झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण 17 सैनिकांना घेऊन जाणारे लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन एका उंच चौकीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले.

टाइम्स स्पेशल

अधिकाऱ्यांनी सांगितले की, लष्कर आणि पोलिसांनी तात्काळ संयुक्त बचाव मोहीम सुरू केली आणि 10 सैनिकांचे मृतदेह बाहेर काढले. इतर नऊ सैनिकांना जखमी अवस्थेत वाचवण्यात आले आणि त्यापैकी तीन गंभीर जखमींना विशेष उपचारांसाठी विमानाने उधमपूर लष्करी रुग्णालयात नेण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg