loader
Breaking News
Breaking News
Foto

केळशी आतगाव परिसरात ओले काजूगर दाखल; पर्यटकांची पसंती

केळशी (मंगेश पाटील) : दापोली तालुक्यातील केळशी आतगाव, रोवले, आंबवली उंबरशेत येथील काजूबिया मोठ्या प्रमाणात विक्रीला बाजारात येऊ लागलेल्या आहेत. नवीन वर्षाच्या हंगामातील नवलाई म्हणून काजूबिया तसेच काजूगर महाग असले तरीही खवय्ये चढ्या दराने देखील या बियांची खरेदी करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या परिसरात काजूगर, काजू बिया, आंबा, पावटा, कडवा, चवळी आदी पिके मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहेत. मात्र बदलत्या वातावरणामुळे यावर्षी काजू, आंबा पिके हंगाम लांबवला आहे. दरवर्षी डिसेंबर महिन्यात सुरू होणारा हा हंगाम यावर्षी जानेवारी महिन्यात सुरू झाला आहे. रोवले येथील शेतकरी सखाराम धाडसे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आम्ही दिवस-रात्र राखण करत असल्याने आंबा, काजू बियांचा चोरवा कमी झाला आहे. गावात काजू बिया, आंबे यांची दरवर्षी चोरी होते. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या बागेची राखण करावी लागत आहे.

टाइम्स स्पेशल

या काजू बिया शेकडा शंभर रुपये दराने बाजारात विक्री केल्या जात आहेत. काजूबिया स्वस्त असल्याकारणाने पर्यटक, तसेच केळशी, आतगांव परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, मेसवाले मोठ्या प्रमाणात विकत घेताना दिसून येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg