रत्नागिरी- हातखंबा जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय हालचालींना जोरदार वेग आला आहे. शिवसेना जिल्हा युवासेना प्रमुख केदार उर्फ मुन्ना देसाई यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे या परिसरात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. मुन्ना देसाई हे हातखंबा परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते असून ते निष्ठावंत शिवसैनिक असल्याची त्यंाची ओळख आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हातखंबा गटातून परशुराम कदम हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेत. यापूर्वी ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते. त्यांनी उमेदवारी दाखल करुन निवडणुकीच्या रणसंग्रामात अपक्ष म्हणून झेप घेतल्याने जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी परशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. असे म्हटले जातेय की, परशुराम कदम यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारली. त्यामुळे त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला.
परशुराम कदम हे निष्ठावान शिवसैनिक असून त्यांचे खास राजकारणातील मार्गदर्शक म्हणून युवा नेते मुन्ना देसाई असल्याचे सांगितले जाते. परशुराम कदम यांच्या हकालपट्टीनंतर मुन्ना देसाई यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केली त्यामध्ये ‘बरं केलंत पंडित साहेब... असेच एका एकाची हाकलपट्टी करा मग गाडीत बसतील येवढेच पदाधिकारी कान भरायला उपयोगी पडतील...आमची तुम्ही करायच्या आधी राजीनामा घ्या...‘ असे म्हटले आहे.

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.