loader
Breaking News
Breaking News
Foto

दुचाकीवरुन हळदीकुंकू कार्यक्रमासाठी निघालेल्या दोघा बहिणींना अज्ञात वाहनाची धडक बसून दोघींचा मृत्यू

नागपूर - गेल्या २४ तासांत राज्याच्या विविध भागांत भीषण अपघातांमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच नागपूर-भंडारा महामार्गावर दोन चुलत बहिणींना आपला जीव गमवावा लागला. तर नाशिक आणि मुंबईत झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. नागपूर-भंडारा महामार्गावर शनिवारी एक मन सुन्न करणारी घटना घडली. एका घरगुती कार्यक्रमासाठी उत्साहाने निघालेल्या दोन बहिणींवर भरधाव वाहनाने झडप घातली. महालगाव जवळील नाग नदीच्या पुलावर झालेल्या या भीषण अपघातात दोन चुलत बहिणींचा करुण अंत झाला. यामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नागपूरच्या पिपळा डाक बंगला परिसरात राहणाऱ्या अलिशा मेहर आणि मोनाली घाटोळे या दोघी बहिणी दुचाकीने भुगाव येथे आयोजित हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात होत्या. भर दुपारी नाग नदीच्या पुलावरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जास्त होती की, अलिशा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मोनाली यांचा रुग्णालयात नेताना वाटेतच अखेरचा श्वास घेतला.

टाईम्स स्पेशल

या अपघातातील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे या मृतांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण होते. अलिशा यांचा विवाह अवघ्या ७ महिन्यांपूर्वी झाला होता. त्या संसाराची नवी स्वप्ने पाहत होत्या. तर दुसरीकडे, मोनाली यांचा विवाह येत्या २६ फेब्रुवारीला निश्चित झाला होता. त्यांच्या घरात लग्नाची खरेदी, नातेवाईकांना निमंत्रण देण्याची लगबग सुरु होती. घरात आनंदाचे वातावरण असतानाच या अपघाताने दोन्ही घरांचे हसते-खेळते अंगण एका क्षणात उजाड केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg