loader
Breaking News
Breaking News
Foto

बोधी नाट्य परिषदेच्या वतीने ४९ वी नाट्य लेखन कार्यशाळा उत्साहात

सावंतवाडी - मराठी रंगभूमीच्या समृद्धीसाठी आणि नव्या लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेली २३ वर्षे कार्यरत असलेल्या बोधी नाट्य परिषद, मुंबई तर्फे नुकतीच ४९ वी 'ज्ञानासाठी कला' बोधी नाट्य लेखन कार्यशाळा नॅनो थिएटर मध्ये पार पडली. प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत १७ आणि १८ जानेवारी २०२६ रोजी या दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ​या कार्यशाळेचे उद्घाटन 'कनक रंगवाचा'चे संपादक वामन पंडित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी दीपक करंजीकर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

व्यासपीठावर नाटककार अशोक हंडोरे, प्रेमानंद गज्वी आणि डॉ. सुरेश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांनी बोधी नाट्य परिषदेच्या अविरत सुरू असलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. नव्या संहितांचे वाचन आणि मंथन ​कार्यशाळेत राज्यातील विविध भागांतून आलेल्या लेखिकांच्या चार दीर्घांकांचे वाचन करण्यात आले. अनघा राजपूत (लातूर), ऋतुजा बडवे (कोल्हापूर),​ उर्मी (ठाणे) व मेधा देशमुख (पुणे) ​या संहितांवर गिरीश पतके, प्रतिभा सराफ आणि अरूण कदम यांनी अभ्यासपूर्ण नाट्य निरीक्षणे नोंदवली. तसेच अवधूत परळकर, नीळकंठ कदम, राजीव जोशी, भालचंद्र कुबल, डॉ. अनिल बांदिवडेकर आणि डॉ. स्मिता दातार यांनी चर्चक म्हणून सहभाग घेत मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

बोधी नाट्य परिषद गेली २३ वर्षे तरुणाईसाठी या कार्यशाळा पूर्णतः मोफत आयोजित करत आहे. आतापर्यंत ​१६० हून अधिक नवीन नाट्य संहितांचे वाचन आणि चर्चा झाली आहे. ​या कार्यशाळांमधून निवडलेल्या नाटकांचे ६ बोधी नाट्य महोत्सव यशस्वीरित्या सादर झाले आहेत. ​दोन दिवस चाललेल्या या शिबिरात एकांक, दीर्घांक आणि नाट्यांक या नाटकाच्या तिन्ही घटकांवर सविस्तर तांत्रिक व प्रायोगिक चर्चा करण्यात आली. मराठी प्रायोगिक रंगभूमीला नवे लेखक मिळवून देण्यात ही कार्यशाळा मैलाचा दगड ठरत आहे. ही कार्यशाळा फक्त महिला नाटककारांसाठीच होती. नाट्यसृष्टीत महिला नाटककार तयार व्हायला पाहिजेत म्हणून हा प्रपंच करण्यात आला होता, असे वामन पंडित यांनी बोलताना सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg