loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघात युतीचा जोरदार प्रचार

साटेली (प्रतिनिधी) - कोनाळ पंचायत समिती मतदार संघात शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाण चिन्हावर सायली निंबाळकर या अधिकृत निवडणूक लढवीत आहेत. या मतदार संघात प्रचारालाही जोरदार सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषद मतदार संघात भाजपाच्या कमळ चिन्हावर अधिकृत उमेदवार म्हणून श्वेता धणेॅ या निवडूणूक लढवीत आहेत. या दोन्ही उमेदवार एकत्र येत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे या मतदार संघात दोन्ही उमेदवारांना मोठ मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोनाळ पंचायत समिती मतदार संघात शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर सायली निंबाळकर या अधिकृत निवडणूक लढवीत आहेत. तर साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा च्या कमळ या चिन्हावर श्वेता धर्णे या अधिकृत निवडणूक लढवीत आहेत. कोनाळ पंचायत समिती मतदार संघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पदाधिकारी प्रचारात उत्तरले आहेत. त्याचं ताकदीने साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपाच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी भाजपा ने कंबर कसली आहे.

टाइम्स स्पेशल

आज सोमवारी कोनाळ पंचायत समिती मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवार सायली निंबाळकर आणि भाजप च्या उमेदवार श्वेता धर्णे यांच्या एकत्र प्रचारासाठी शिवसेना आणि भाजपा चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उतरले आणि त्यांनी दोन्ही उमेदवाराच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी शिवसेने चे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, राजेंद्र निंबाळकर भाजपाचे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. कोनाळ पंचायत समिती मतदार संघात शिवसेना आणि भाजपा एकत्र येत शिवसेना उमेदवार सायली निंबाळकर आणि भाजपा उमेदवार श्वेता धर्णे यांचा एकत्र प्रचाराला सुरुवात झाल्याने या मतदार संघात दोन्ही उमेदवारांना मोठा मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg