loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत अल्पवयीन चालकाचा थरार; उभ्या जनरेटर व्हॅनसह मंगल कार्यालयाच्या भिंतीला धडक

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील सालईवाडा येथे मध्यरात्री एका अल्पवयीन चालकाने भरधाव इनोव्हा कार चालवत मोठा अपघात घडवला. या अपघातात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या जनरेटर व्हॅनसह रवींद्र मंगल कार्यालयाच्या संरक्षक भिंतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित वाहन जप्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एक अल्पवयीन चालक आपल्या ताब्यातील इनोव्हा (MH 04 FA 4554) कार घेऊन सावंतवाडीकडून शिरोड्याच्या दिशेने जात होता. सालईवाडा येथील रवींद्र मंगल कार्यालयाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या टाटा २०७ डी. आय. जनरेटर व्हॅनला (MH 10 K 7727) जोरदार धडक दिली. ​धडक इतकी भीषण होती की, जनरेटर व्हॅनचे नुकसान करून ही कार पुढे मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागातील विटांच्या कंपाउंडच्या भिंतीवर जाऊन आदळली. यात भिंतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

टाइम्स स्पेशल

अपघात घडल्यानंतर अल्पवयीन चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याला पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी आरोपी क्र. २ याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगल कार्यालयाचे मालक अमित रवींद्र आरवारी (रा. सालईवाडा) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ​तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातातील इनोव्हा कार जप्त केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अनिल धुरी हे हवालदार महेश जाधव यांच्या मदतीने करत आहेत. ​मध्यरात्री झालेल्या या भीषण आवाजामुळे परिसरात खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन सोपवणाऱ्या पालकांबाबत आता संताप व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg