loader
Breaking News
Breaking News
Foto

अमोल चौगुले याची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड

मालवण (प्रतिनिधी) - मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय, मालवणचा माजी विद्यार्थी अमोल बाबुराव चौगुले (कॉमर्स, सन 2021-22 बॅच) याची भारतीय सैन्य दलाच्या आसाम रायफलमध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर यांच्या हस्ते अमोल चौगुले याला शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी अमोल चौगुले याला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाला मुंबई येथून आलेले अकाउंटन्सी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक लऊ परब यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य तिवले, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

अमोल चौगुले याने आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि महाविद्यालयातील मार्गदर्शनाला दिले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत व शिस्तीच्या जोरावर राष्ट्रीय पातळीवर यश मिळवावे, असे मार्गदर्शन उपस्थित मान्यवरांनी केले. अमोलच्या यशामुळे भंडारी एज्युकेशन सोसायटी आणि मालवण तालुक्याचा नावलौकिक वाढल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg