loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई अधिकृत संगीत परीक्षेमध्ये रोटरी स्कूलचा 100 टक्के निकाल

खेड (प्रतिनिधी) - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे रोटरी इंग्लिश मिडिअम स्कूलमध्ये झालेल्या संगीत परीक्षेमध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केले. या परीक्षेमध्ये 32 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. तरी सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील परीक्षेसाठी पात्र होण्याचा बहुमान मिळविला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि. 14 डिसेंबर रोजी झालेल्या प्रारंभिक परीक्षेत गायन या विषयासाठी एकूण 19 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये अव्दैत मळणगांवकर, मीरा खेडेकर, मृण्मयी दामले, नव्या देवरुखकर, चैत्राली क्षीरसागर, निष्ठा वाडकर, मेदीनी पेंडखळकर, आराध्या आंबेडे, श्रीनिती चव्हाण, तृष्णा चिखले, अंतरा शेठ, विराज गावडे, स्वरा कदम, श्रेयसी इब्रामपूरकर, किंजल महाजन, अनया पाटील, जिज्ञा बामणे, भक्ती जाधव, नैतिका जैजू व दि. 20 डिसेंबर रोजी झालेल्या तबला परीक्षेसाठी 12 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यामध्ये कार्तिक चव्हाण, सार्थक काते, ऋग्वेद अढावडे, सोहम निगडेकर, पलाश वर्पे, लावण्य दरेकर, आयुष मोरे, वरद भागणे, आराध्य मांडवकर, अधिराज मांडवकर, अर्णव दामले, दुर्वांक कोकाटे इ. तर प्रवेशिका प्रथमसाठी काव्या कान्हेरे प्रविष्ठ झाली होती. सदर विद्यार्थ्यांनी परीक्षेत यश संपादीत करुन रोटरी स्कूलचे नाव गौरवित केले.

टाइम्स स्पेशल

या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक अभिषेक जोशी, कर्णिका निगडेकर तबला शिक्षक नयन किरडवकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg