loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर पंचायत समितीवर सत्ता राखण्याचे उबाठासेनेसमोर मोठे आव्हान

देवरूख (सुरेश सप्रे) संगमेश्वर तालुक्यात सन १९९० विधानसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीकडून तात्कालिन तालुका प्रमुख रवींद्र माने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी शिवसेना भाजपा युतीच्या असंख्य कार्यकर्तेसह स्वयंसेवक संघाचे व भाजपाच्या अनेक जेष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेसह लोकाधिकार समितीचे पदाधिकारी व तालुक्यातील नवख्या शिवसैनिकांना बरोबर घेत तन.मन.धनाने नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत तरुण तडफदार अशा युवकाला विधानसभेत धाडले.. विधानसभेत पहील्याच अधिवेशनात प्रथमच आमदार झालेल्या या युवकाने आपल्या पहिल्याच भाषणात वक्तृत्वाची चुणूक दाखवत सर्वांच लक्ष वेधले घेतले होते. आमदार झालेनंतर रवींद्र माने यांनी भाजपाच्या मदतीने तालुक्यातील विकासाला गती देण्याचा प्रयत्न केला.. १९९२च्या जिपच्य निवडणूकीत सेना भाजपा युतीने पंचायत समितीवर भगवा फडकविण्यात यश मिळविले..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९९२ साली पंचायत समितीवर शिवसेना भाजपायुतीने भगवा फडवला होता .. त्यावेळी पासून मुंबई स्थित सुभाष बने.जयराम रामाणे.दिपक खामकर. यांचेसह राजेंद्र महाडीक. संतोष लाड. सुभाष नलावडे. अशोक सप्रे. प्रकाश जाधव. बाळ मोरे. राजन कापडी.रश्मी कदम.वेदा फडके.स्मिता लाड. चांदखान. विजय कदम.कृष्णा हरेकर. आदींना रवींद्र माने यांनी राजकारणात पुढे आणत तालुक्यात शिवसेनेची मजबूत फळी निर्माण केली होती. मधल्या काळात शिवसेनेतून रवींद्र माने. सुभाष बने. रश्मी कदम यांचेसह अनेक नेत्यांनी पक्षांतरे केली असली तरी मतदार राजाच्या जोरावर पंचायत समितीवर सेनेचा भगवा कायम ठेवण्यात यश मिळवले होते. त्यावेळीपासून आजपर्यंत या पंचायत समितीवर शिवसेनेचा भगवा कायम आहे. आता शिवसेनेत उभी फुट पडली व अनेक जुने नेते व कार्यकर्त्यांनी आपल्या फायद्यासाठी उबाठाची साथ सोडली असली तरी ज्यांनी तालुक्यात शिवसेना रूजवली व वाढवली ते माजी मंत्री रवींद्र माने हे पुन्हा स्वगृही परतले असल्याने उबाठाची ताकद वाढली असल्याने यावेळीच्या निवडणूकीत भगवा कायम ठेवण्यात यशस्वी होतात की नवीन राजकीय समीकरणात पंचायत समितीत संत्तातर होते हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे..

टाइम्स स्पेशल

गेल्या ३५वर्षात सेनेत अनेक स्थित्यंतरे झाली तरी शिवसेनाला मानणारा मतदार हा कायम सेनेबरोबर राहीला असला तरी आता सेनेत उभी फुट पडली असलेने यावेळी पंचायत समितीवर उबाठाची सत्ता कायम ठेवण्याचे खडतर आव्हान माजी मंत्री रवींद्र माने यांचे समोर असणार आहे. त्यात त्यांना किती यश मिळते यावर सारे अवलंबून आहे. या बदलेल्या राजकीय परिस्थितीत मतदार राजा नक्की कोणाच्या बाजूने उभा राहतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे..

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

माजी मंत्री रवींद्र माने यांची कसोटी पणाला? सारे शक्य

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg