loader
Breaking News
Breaking News
Foto

आवाडा येथील ग्रामदैवत श्री देव पाटेकर येथे सावंतवाडी संस्थान चे श्रीमंत खेम सावंत-भोसले यांची भेट

दोडामार्ग (प्रतिनिधी) - संस्थान कालीन इतिहास लाभलेल्या आवाडा येथील ग्रामदैवत श्री देव पाटेकर वार्षिक उत्सव शनिवारी मोठया उत्साहात पार पडला या ठिकाणी शनिवारी सायंकाळी सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेम सावंत यांनी भेट दिली. धार्मिक ठिकाणी दर्शन घेतले यावेळी आवाडा येथील ग्रामस्थ तसेच देवस्थान समिती वतीने श्रीमंत खेम सावंत भोसले यांचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आवाडा येथील कोट पाटेकर देवस्थान मोठा इतिहास आहे. संस्थान काळापूर्वी हे देव पाटेकर जागृत देवस्थान आहे. आवाडा येथील ग्रामस्थ दरवर्षी या ठिकाणी वार्षिक उत्सव साजरा करतात, सावंतवाडी संस्थान येथील मंडळी हजेरी लावतात. पूर्वी साधा चौथरा मंदीर होते. नंतर आवाडा येथील ग्रामस्थ यांनी सुधारणा करून नवीन मंदीर बांधकाम केले. पण या ठिकाणी चांगले मोठे मंदीर उभारणी संकल्प केला आहे. भाविकांनी आर्थिक तसेच वस्तू स्वरूपात बांधकाम करीता सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

टाइम्स स्पेशल

आवाडा येथील देव पाटेकर वार्षिक उत्सव उत्साहात पार पडला. शेकडो भाविकांनी भेट दिली, दर्शन घेतले. यावेळी श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी उपस्थित ग्रामस्थ याना मार्गदर्शन केले. कशिश किशोर मयेकर हिने स्वागत केले. यावेळी सरपंच हरी नाईक तसेच इतर मंडळी आवाडा येथील ग्रामस्थ आवाडा विकास मंडळ मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते अध्यक्ष राजन नांगरे, सचिव अंकुश नाईक, खजिनदार अनिल देसाई, आवाडा गाव प्रमुख बाबुराव नाईक, खजिनदार किशोर मयेकर, महेश नाईक, प्रशांत नाईक, इतर आवाडे ग्रामस्थ उपस्थित होते. आवाडा ग्रामस्थ मंडळ मुंबई यांच्यावतीने अनेक मंडळींचे स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg