खेड - खेड तालुक्यातील पंधरागाव मौजे धामणंद येथील स्व.राजारामराव पालांडे (मास्तर) ३६० डिग्री क्रीडा संकुलात फेडरेशनचे अध्यक्ष महेश शिवाजी महापदी आणि कार्यकारिणी, सभासद, ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरागाव चषक स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेमध्ये एकूण ३६ संघानी सहभाग घेतला होता. शेवटच्या दिवशी तर अतिशय तुल्यबळ लढती पाहायला भेटल्या ज्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. यामध्ये जय गणेश पोसरे संघाने अव्वल क्रमांक घेऊन पंधरागाव चषक २०२६ वर आपले नाव कोरले तर धामणंद गुड्याचा आड संघ उपविजेते राहिले. या स्पर्धेमध्ये एकूण ६ बक्षीसे होती. यात वावे चिंचाटवाडी तृतीय, धामणंद पायरवाडी चतुर्थ, मुसाड चांदेवाडी पाचव्या तर चोरवणे जखमींचीवाडी यांनी सहाव्या क्रमांचे विजेते ठरले. स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू मालिकावीर म्हणून गणेश केळसकर (जय गणेश पोसरे), उत्कृष्ट फलंदाज वैभव आदावडे (वगळाचा माळ), उत्कृष्ट गोलंदाज नवनाथ बेलेकर (गुड्याचा आड), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक रुपेश उतेकर (गुढ्याचा आड) यांनी वैयक्तित बक्षिसे मिळवली तर स्पर्धेत विजय उपाले (पाली उपालेवाडी) श्रेयस शिरावले (पायरवाडी धामणंद) अक्षय चांदे (मुसाड चांदेवाडी) यांची विशेष कामगिरी उल्लेखनिय ठरली.
या स्पर्धेसोबत पंधरागाव चषक २०२६ची मिरवणूक हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले. यामध्ये यशवंत विद्यालय धामनंद विद्यार्थी यांचे लेझीम ढोल पथक आणि शारदा विद्यालय चोरवणे सैनिकी शाळेतील विद्याथी यांचे संचलन यांची कामगिरी विशेष लक्षणीय ठरली. फेडरेशन तर्फे मोफत आरोग्य शिबिराचे व डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ७५ नागरिकांनी यांचा लाभ घेतला. तसेच जेष्ठ नागरिकांना आधार काठीचे वाटप देखील करण्यात आले. या स्पर्धेचे उद्दिष्ट हे, सर्व निधी श्री महालिंग मंदिराला अर्पण करण्याचे असल्यामुळे या स्पर्धेकरिता देणगीदारांचा उदंड प्रतिसाद लाभला. अजित उतेकर यांच्यामुळे १०हजार पेक्षा जास्त लोकांनी सामन्याचा ऑनलाईन आनंद घेतला. या कार्यक्रमाला मान्यवर, ग्रामस्थ आणि असंख्य क्रिडाप्रेमी उपस्थित होते.

























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.