loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रेरणा संस्थेची वार्षिक सत्यनारायण महापूजा जल्लोषात

मुंबइ - भूखंड क्रमांक १५६, प्रेरणा संस्था (रजि.) चारकोप सेक्टर १च्या वतीने आयोजित केलेल्या ३६ व्या सत्यनारायण महापूजे निमित्त हळदीकुंकू, महाप्रसाद, कला, क्रीडा सांस्कृतिक व प्रवीण सावंत, झाली कृपा साईंची समूहाचे सुस्वर सुगम भजन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम संस्थेतील बाळ-गोपाळ, महिला मंडळ व रहिवाश्यांनी जल्लोषात व उत्साहात साजरे केले. ’युवा प्रेरणा मंडळ’ आणि ’प्रेरणा संस्था पूजा समिती’ यांचे अभिजात मराठी संस्कृतीचा साधेपणा जपणारे आयोजन पाहून मन भारावून गेले. सध्या सर्रास दिसून येणार्‍या अशाश्वत कार्यक्रमांपेक्षा प्रतीवर्षी अशाच अभिजात सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्यास आग्रही असल्याचे संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय साईल व पूजा समिती प्रमुख नितीन शिगवण व युवा मित्र मंडळाच्या सर्व सभासदांनी प्रतिपादन केले. प्रेरणा संस्थेतील रहिवाशांनीही या कार्यक्रमास उदंड प्रतिसाद दर्शवून संस्कृतीच्या संवर्धनाच्या या महत्कार्यात आपले मोलाचे योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थेतील प्रशांत संभाजी जाधव हे सनदी लेखापाल (सी. ए.) परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व अद्विका अभिजित पालांडे हिने इंटरनॅशनल स्केटिंग स्पर्धांमधून अनेक सुवर्ण पदके प्राप्त केल्याबद्दल तसेच विविध स्पर्धेत सहभागी झालेले बाळ गोपाळ, महिला यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नवनिर्वाचित नगरसेविका दक्षता कवठणकर, मा. नगरसेवक व सल्लागार सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मक मंडळ श्रीकांत कवठणकर, सर्वश्री योगेश पडवळ सचिव उत्तर मुंबई भाजपा, निखिल गुढेकर शिवसेना शाखाप्रमुख, प्रमोद गुजर मा. वॉर्ड अध्यक्ष भाजपा, मनीष साळुंखे वॉर्ड अध्यक्ष भाजपा, शशांक चौकीदार अध्यक्ष प्रबोधनकार ठाकरेनगर युनियन चारकोप, मनाली चौकीदार महिला विभाग प्रमुख शिवसेना, विशाखा मोरये महिला विभाग प्रमुख शिवसेना, सर्वश्री राजेंद्र (राजू मामा) खंकाळ समाजसेवक, भूषण विचारे आपला माणूस, उदय कोंडविलकर शाखा अध्यक्ष मनसे, संतोष गवळी शाखा प्रमुख शिवसेना व इतर अनेक मान्यवरांनी श्रीचे दर्शन घेतले आणि आयोजकांस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप गोसावी, स्वप्नील शिंदे, प्रणाली राऊळ व स्नेहल निनाद पवार यांनी केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg