loader
Breaking News
Breaking News
Foto

'पार्थ पवारांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला येऊ नये', भाजपकडून स्पष्ट संदेश..

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका नव्या वादळाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आज (31 जानेवारी) दुपारी 5 वाजता महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मात्र, या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, असा स्पष्ट संदेश भारतीय जनता पक्षाकडून (BJP) देण्यात आला आहे. यामागे पार्थ पवारांवरील पुण्यातील भूखंड प्रकरणातील सुरू असलेली चौकशी आणि संबंधित समितीचा अहवाल आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याच प्रकरणामुळे पार्थ पवार स्टेजवर आल्यास भाजपच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी पार्थ पवारांना या कार्यक्रमापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं समजतं आहे. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी मुंबईतील राजभवनात जोरात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत सुनेत्रा पवारांना नेते म्हणून निवडण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पक्षाच्या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारांच्या भूमिकेवर चर्चा सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg