loader
Breaking News
Breaking News
Foto

व्यक्तिमत्त्व विकास व्याख्यानमाला संपन्न

रत्नागिरी - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ संलग्नित यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, रत्नागिरी येथे बहि:शाल शिक्षण मंडळ योजनेअंतर्गत "व्यक्तिमत्त्व विकास" विषयावर ५ सत्रांची प्रेरणादायी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या व्याख्यानमालेत आत्म-शोध, संवाद कौशल्य, ध्येय-निश्चिती, भावनिक बुद्धिमत्ता आणि आत्मविश्वास याविषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शक अमेय मुळ्ये आणि ऋषिकेश मेहेंदळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या रजिस्ट्रार शलाका लाड, सहाय्यक रजिस्ट्रार मानसी मुळे, कॉलेजचे प्राचार्य चेतन अंबुपे, उपप्राचार्या अपेक्षा आंबवकर, सुनीता अरगडे आणि अर्चना बाईत यांची उपस्थिती लाभली.

टाइम्स स्पेशल

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे आणि समाजनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घडवून आणणे हा होता. कार्यक्रमाचे समन्वयक अमेय भागवत होते. कार्यक्रमासाठी एकूण १०० विद्यार्थी सहभागी होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg