loader
Breaking News
Breaking News
Foto

कोसुंब जिपगटात सेना भाजपात मैत्रीपूर्ण लढत होणार हे वृत्त तंतोतंत खरे

देवरूख सुरेश सप्रे संगमेश्वर तालुक्यात जिप व पंस निवडणूकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे जागा वाटपात कोणाला कीती जागा मिळाणार यावर गेले अनेक जोरदार चर्चा सुरू होती. जागावाटपात सात गटात राष्ट्रवादी काँग्रेस ला एक भाजपाला दोन तर शिवसेनेला चार जागा असे जागा वाटप होईल तर अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कोसुंब गटात भाजप व शिवसेना यांचे मधे मैत्रीपूर्ण लढत होणेची शक्यता दै रत्नागिरी टाइम्स च्या वृत्तपत्रात वर्तविण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यात धामापूर तर्फे संगमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेस. कडवई व साडवली भाजपा. तर कसबा. नावडी. दाभोळे व कोसुंब गट शिवसेना असे जागा वाटप होईल. व कोसुंब गटात सेना भाजपात मैत्रीपूर्ण लढत होणेची शक्यता आहे असे अभ्यासपूर्ण भाकीत करण्यात आले होते. ते वृत्त तंतोतंत खरे झाले आहे.. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कोसुंब गटातून भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य व विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाचा AB फाँर्म शेवटच्याक्षणी जोडत भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत.. पक्षाकडून ABफाँर्म दोन दिवसापूर्वी देण्यात आला होता. तरीही अत्यंत गोपनीयता ठेवून आज सर्वांना गाफील ठेवत शेवटचे क्षणी तो जोडण्याची खबरदारी घेत आपली उमेदवारी निश्चित करत मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे निश्चित झाले आहे.. याबाबत दै. रत्नागिरी टाइम्स ने दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले आहे..

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg