loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील सागर महोत्सवात सिंधुदुर्गची मोहोर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आसमंत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे आयोजित केलेला सागर महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला यासाठी देशातील समुद्र विज्ञानातील निष्णात शास्त्रज्ञ, नामवंत शिक्षणतज्ञ, उपक्रमशील शिक्षक तसेच राज्यातील हजारो महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच विज्ञान प्रेमी उपस्थित होते. पुराण काळातील अमृत मंथन प्रमाणे आधुनिक काळात सागरासंबंधी विचारांचे मंथन करणार्‍या या सागर महोत्सवाच्या निमित्ताने समुद्री अर्थव्यवस्था अर्थात ब्लू इकॉनॉमीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हरित क्रांती, श्वेत क्रांती नंतर आता नील क्रांतीचे युग येत असून त्यात भारतीय युवकांना प्रचंड संधी असल्याचे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मश्री डॉ शैलेश नायक यांनी व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशाला हजारो किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे पण आजतागायत त्याप्रमाणात सागर संवर्धनासंबंधी जाणीव जागृती झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. या महोत्सवात ओशिनोग्राफीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पद्मश्री डॉ शैलेश नायक, डॉ इंगोले, डॉ डामरे यांसारख्या अनेक ऋषितुल्य वैज्ञानिकांचे सागरी जैवविविधतेसंबंधी व्याख्यान, विज्ञान भारतीचे अध्यक्ष तथा पुणे विद्यापीठाचे ज्ञानमहर्षी डॉ शेखर मांडे यांचे क्लायमेट चेंज याविषयी मार्गदर्शन, वैद्यकीय उपचारापासून ते खनिकर्मच्या क्षेत्रात कार्यरत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओसिनोग्राफी या भारतातील अग्रगण्य संस्थेचे मार्गदर्शन या बरोबरच मॅनग्रूव, शोअर वॉक, डॉक्युमेंटरी, पथनाट्य, जखमी कासवांची काळजी घेणार्‍या डॉ दिनेश विन्हेरकर यांची मुलाखत, बायो एन्झाईम कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक, तरुण शास्त्रज्ञांचे अनुभवकथन अशा अनेक रंजक गोष्टींची रेलचेल यामुळे नवतरुणांना एक वेगळा अनुभव तर मिळालाच तसेच करियरची वेगळी वाटही समजली.

टाईम्स स्पेशल

यानिमित्त समुद्र विज्ञान क्षेत्रात काम करणार्‍या दिग्गज व्यक्तींची प्रत्यक्ष भेट तसेच पर्यावरण साक्षरता संदर्भात भरीव कार्य करत असलेले आसमंतचे पदाधिकारी नंदकुमार पटवर्धन, जगदीश खेर, नितीन करमरकर, पुरुषोत्तम पेंडसे आणि त्यांचे सहकारी यांचे कार्य जवळून पाहता आले. या महोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, जिल्हा संघटक सत्यपाल लाडगावकर, कोषाध्यक्ष राजाराम फर्जंद, सदस्य पृथ्वीराज बर्डे,संजय तुळसकर, पृथ्वीराज बर्डे, कणकवली तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, देवगड तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सतिशकुमार कर्ले, सचिव सागर फाळके, सदस्य तन्मय कोठावळे, जोईल, सागर कोकरे, वैभववाडी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष अविनाश कांबळे, दोडामार्ग तालुका विज्ञान मंडळाचे सचिव अरुण सावंत, सदस्य नरेंद्र शिंपी, असरोंडी मुख्याध्यापक विद्यालयाचे सुशांत पाटील, माजगाव विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब चवरे उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg