loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात महायुतीचे उमेदवार जाहीर

केळंबे-लांजा(सिराज नेवरेकर) - पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लांजात शिवसेना-भाजप महायुतीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. लांजा तालुका शिवसेना कार्यालय येथे मंगळवारी शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत महायुतीच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. यामध्ये पंचायत समिती ८ तर जिल्हा परिषद ४ अशा एकूण १२ उमेदवारांची नावे पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली. लांजा येथे शिवसेना कार्यालय येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना माहिती देताना शिवसेना तालुका प्रमुख गुरुप्रसाद देसाई, महायुतीचे प्रचार प्रमुख प्रसन्न शेट्ये, राजेंद्र धावणे, जगदीश राजापकर, चंद्रकांत मांडवकर, भाजप तालुक अध्यक्ष शलेंद्र खामकर, विराज हरमले महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परीषद गवाणे गट संतोष कृष्णा रेवारी, आसगे गट मनिषा गणेश लाखण, भांबेड गट विनिता विनय गांगण, साटवली गटातून लिला मोहन घडशी. पंचायत समिती गणातून आसगे गणातून मानसी सिध्देश्वर आंबेकर, वेरवली गणातून साक्षी भिकाजी चव्हाण, गवाणे गणातून दीपाली जयवंत दळवी, खानवली गणातून यशवंत देवू वाकडे, भांबेड गणातून शैलेश मनोहर खामकर(भाजपा पक्ष) प्रभानवल्ली गणातून उमेश अरूण पत्की, साटवली गणातून आदेश दत्तात्रय आंबोळकर, वाकेड गणातून रसिका रमाकांत मेस्त्रि. युतीमध्ये भाजपा पक्षाला एक जागा सोडण्यात आली आहे. तर बाकी सर्व जागा शिवसेना लढत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg