loader
Breaking News
Breaking News
Foto

दिल्लीत झळकली महाराष्ट्राची झाकी; गणेशोत्सवाच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली: सणांची भूमी असलेल्या महाराष्ट्राने प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला. या चित्ररथाद्वारे आत्मनिर्भरता आर्थिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक आत्मनिर्भरतेची एकात्मता दर्शवण्यात आली. चित्ररथाच्या पुढच्या भागात, गणेशोत्सवाशी संबंधित, एका महिलेद्वारे वाजवल्या जाणाऱ्या पारंपरिक ढोलाचे भव्य दृश्य दाखवण्यात आले आहे. चित्ररथाच्या मागील भागात एक शिल्पकार गणपतीची मूर्ती तयार करताना दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मध्यभागी, एक गणेशभक्त गणपतीची मूर्ती डोक्यावर घेऊन गणेश विसर्जनासाठी जात असल्याचे दाखवण्यात आले आहे.चित्ररथाच्या शेवटच्या भागात 'अष्टविनायका'चे प्रतिनिधित्व करणारे मंदिर दर्शवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, गणेशोत्सवाशी संबंधित इतर सांस्कृतिक घटक देखील संचलनात प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना कर्तव्य पथावर, पारंपरिक वेशभूषेतील महिला लेझिम लोकनृत्य सादर करत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg