खेड - इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी. यासाठी मंथन तर्फे सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात येते. खेड तालुक्यांमध्ये नवभारत हायस्कूल भरणे, कविता सराफ हायस्कूल लोटे, कर्जी हायस्कूल, त्याचप्रमाणे ज्ञानदीप हायस्कूल खेड या परीक्षा केंद्रावर अनेक विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा संपन्न झाली. जिल्हा परिषदेसह हायस्कूलचे विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. बालवयातच वयापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड लागावी यासाठी मंथन तर्फे राज्यस्तरिय परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यात चार परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.
या परीक्षेचे खेड तालुका समन्वयक मंगेश झावरे यांच्या नियोजनानुसार नवभारत हायस्कूल भरणे येथे केंद्र संचालक म्हणून परेश खोपडे, कर्जी हायस्कूल येथे गणोची माने, लोटे हायस्कूल येथे अविनाश थोरात, तसेच ज्ञानदीप खेड येथे राहुल जाधव यांनी केंद्र संचालक म्हणून काम केले. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी यासाठी मंथन तर्फे परीक्षेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या परीक्षेला ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक विद्यार्थी प्रविष्ट होतात. या स्पर्धापरीक्षेत वैयक्तिक बक्षिसासह राज्यस्तरावर झळकलेल्या विद्यार्थ्यांना मंथन तर्फे बक्षीस देऊन गौरविण्यात येते.
या परीक्षेसाठी नवभारत हायस्कूल प्राचार्य महेश बोधे, ज्ञानदीप हायस्कूल मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, कर्जी हायस्कूल मुख्याध्यापक फरहिन, लोटे हायस्कूल मुख्याध्यापक बसवंत यांनी परीक्षा केंद्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल मंथन परिवाराच्या वतीने खेड तालुका समन्वयक मंगेश झावरे यांनी आभार मानले.



























.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)













































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.