loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड रेल्वेस्टेशन पुलाखाली अंमली पदार्थ गांजाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा दाखल

खेड - शहराजवळील भोस्ते, खेड रेल्वे स्टेशन पुलाखाली अंमली पदार्थ गांजाचे सेवन करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोस्ते खेड रेल्वे स्टेशन पुलाखाली दि. ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास संशयित आरोपी बिकाश विजय रामकुमार (वय- २६ वर्षे, रा. बरही, डूमरडीह, देवचंदा, हजारीबाग, राज्य झारखंड) हा गांजा या अंमली पदार्थांचे सेवन करीत असताना रंगेहाथ मिळून आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलीस ठाण्याचे चालक पोलीस शिपाई रोहीत रामचंद्र जोयशी यांनी येथील पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केल्यानुसार पोलिसांनी दि. ३० जानेवारी २०२६ रोजी रात्रौ १०:५८ वाजता संशयित आरोपी बिकाश विजयरामकुमार याच्याविरोधात गुन्हा रजि.नं. २०/२०२६, अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम - १९८५ चे कायदा कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg