loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमध्ये वैश्यवाणी प्रिमियर लीग २०२६ चा जल्लोष

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘वैश्यवाणी प्रिमियर लीग (VPL) २०२६’ या भव्य आणि बहुप्रतीक्षित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून, वैश्यवाणी समाजातील खेळाडूंना एकत्र आणणारा क्रीडा महोत्सव म्हणून ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या या स्पर्धेने गुहागर तालुक्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. रविवार दि. २५ जानेवारी ते सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ या दोन दिवसांत ही स्पर्धा रंगणार असून, शेकडो क्रिकेटप्रेमी, खेळाडू व कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी या स्पर्धेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता, यंदाही उत्कंठावर्धक सामने आणि जबरदस्त चुरस पाहायला मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार असून, या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सोमवारी दि. २६ जानेवारी रोजी साखळी सामन्यांनंतर सायंकाळी ४ वाजता अंतिम सामना व भव्य बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळत आहे. शृंगारतळी – जानवळे फाट्यासमोरील गोल्डन पार्क मैदानावर होणारी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळाने विशेष तयारी केली असून, सर्व क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रीडा महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg