loader
Breaking News
Breaking News
Foto

आरे - नागझरीतील ग्रामस्थांनी स्वखर्चातून उभारला स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता

रत्नागिरी - आरे-नागझरी येथील ग्रामस्थानी आदर्शवत काम केले आहे. येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी योग्य प्रकारचा रस्ता नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी या गावातील ग्रामस्थानीच पुढाकार घेत रस्ता उभारण्यासाठी निधी उभा केला. जमलेल्या निधीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी - गणपतीपुळे मार्गावर आरे नागझरी गाव लागते. आरे - वारे समुद्रानजिक मुख्य रस्त्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे. स्मशानभूमी रस्त्यालगत असून देखील स्मशानभूमी पर्यंत पोहचण्यासाठी योग्य रस्ता नव्हता. यामुळे स्मशानभूमी पर्यंत जाताना ग्रामस्थांना प्रचंड हाल सहन करावे लागत होते.

टाइम्स स्पेशल

ही अडचण दूर करण्यासाठी गावातील ग्रामस्थानीच पुढाकार घेतला. ग्रामस्थानी जमेल तशी वर्गणी काढून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. आवश्यक निधी जमा झाल्यानंतर स्मशानभूमीकडे जाणारा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रस्त्याचे काम नुकतेच करण्याता आले. सुरुवातीला कच्च्या स्वरूपात रस्ता तयार करण्यात आला असून भविष्यात डांबरी रस्ता तयार करण्यात येणार आहे. आरे - नागझरीतील ग्रामस्थांनी एक आदर्श सर्वांसमोर ठेवला असून याचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg