loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत संगमेश्वरचे दैदीप्यमान यश

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - इचलकरंजी येथे नुकत्याच पार पडलेल्या मास्टर एज्युकेशन अकॅडमी आयोजित राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत संगमेश्वर येथील विवान भांगे व सिया कुचेकर या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत चॅम्पियन हा मान पटकावला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेदरम्यान अवघड व क्लिष्ट अशा गणिती गणना अत्यंत कमी वेळेत व अचूकरीत्या सोडवत विवान व सिया यांनी आपल्या बौद्धिक क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यांच्या वेगवान गणनाशक्तीने व अचूकतेने परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आणि अखेर चॅम्पियनपदावर आपले नाव कोरले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांच्या या यशामागे वीरा इन्स्टिट्यूट, संगमेश्वर येथील संचालक धनाजी भांगे, पुष्पा अकॅडमीच्या संचालिका सविता भन्साळी तसेच मास्टर एज्युकेशन अकॅडमीचे संचालक शिवराज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव व तज्ञ मार्गदर्शनाच्या जोरावरच विवान व सिया यांनी हे चॅम्पियनपद मिळवले, असे मत व्यक्त केले जात आहे. या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था व संगमेश्वर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हे यश संगमेश्वरच्या शैक्षणिक प्रगतीची व गुणवत्तेची साक्ष देणारे असून, इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg