loader
Breaking News
Breaking News
Foto

कणकवली तालुक्यात ४ उमेदवारी अर्ज दाखल

कणकवली (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी आहे. मात्र कणकवली तालुक्यातून 20 जानेवारी पर्यंत केवळ 4 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे 21 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कणकवली तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी कलमठ जिल्हा परिषद गटासाठी वैदेही विलास गुडेकर (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आपले 2 उमेदवारी अर्ज सुचकांमार्फत दाखल केले. फोंडाघाट जिल्हा परिषद गटामधून अनंत पिळणकर (राष्ट्रवादी, शरद पवार) यांनी 1 अर्ज दाखल केला तर हरकुळ बुद्रुक पंचायत समिती गणासाठी सायली संजय तोरसकर (भाजप पक्षातर्फे डमी) अर्ज दाखल केला. त्यामुळे 8 जिल्हा परिषद गटासाठी व 16 पंचायत समिती गणासाठी केवळ आतापर्यंत 4 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी दिली.

टाइम्स स्पेशल

यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते. व निवडणूक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विविध टेबल जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्याठिकाणी निवडणूक अधिकारी यांच्याकडून दाखल नामर्निदेशन पत्राची तपासणी करुन अर्ज स्विकारले जात आहेत. अपेक्षेप्रमाणे शेवटच्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg