loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागरमधील दुर्गादेवीवाडी मुख्य रहदारीचा रस्ता खचल्यामुळे मनसेचे नगरपंचायतला निवेदन

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील प्रभाग ४ मधील दुर्गादेवी वाडीकडे जाणारा रस्ता अचानक तांत्रिक कारणांमुळे खचला आहे. हा रस्ता रहदारीसाठी अत्यंत महत्त्वाचा असून तसेच दुर्गादेवी देवस्थानकडे जाणारा असल्याने पर्यटकांची वाहने ही याच मार्गाने ये-जा करत असतात. रस्ता खचल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. मनसेच्या प्रभाग क्रमांक ०४ च्या नगरसेविका कोमल दर्शन जांगळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन गुहागर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांची व मुख्याधिकारी यांची भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून प्रशासनाला या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निवेदन दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खचलेल्या रस्त्याची तात्काळ पाहणी करून त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, जेणेकरून रहदारी सुरक्षित होईल. रस्त्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे, जेणेकरून स्थानिक नागरिकांची आणि वाहनधारकांची गैरसोय दूर होईल. तसेच, भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास किंवा कामाला विलंब झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक ४ च्या मनसे नगरसेविका सौ कोमल दर्शन जांगळी, शहराध्यक्ष अभिजित रायकर उप शहराध्यक्ष विक्रांत सांगळे, वॉर्ड उपाध्यक्ष दर्शन जांगळी, प्रमोद मस्कर, अक्षय जोशी, ओंकार सांगळे आणि त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg