loader
Breaking News
Breaking News
Foto

जेसीआय फेस्टीव्हल २०२६ मध्ये रंगणार भव्य खुल्या गट नृत्य स्पर्धा

खेड (प्रतिनिधी)- JCI खेड यांच्यावतीने आयोजित JCI Festival 2026 अंतर्गत तरुण कलाकारांसाठी एक मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, भव्य खुल्या गट नृत्य स्पर्धेचे आयोजन दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत किमान 7 किंवा त्याहून अधिक सदस्य असलेले नृत्यगट सहभागी होऊ शकतात. नृत्यकलेतून आपली प्रतिभा सादर करण्यासाठी तसेच मोठी बक्षिसे जिंकण्याची ही सुवर्णसंधी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे व चषक ठेवण्यात आले असून, प्रथम क्रमांक – ₹25,000/- रोख व आकर्षक चषक द्वितीय क्रमांक – ₹17,000/- रोख व आकर्षक चषक तृतीय क्रमांक – ₹11,000/- रोख व आकर्षक चषक अशी बक्षिसांची रचना करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ₹1,000/- इतके ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नोंदणीसाठी इच्छुक नृत्यगटांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. मधुर पेठे – 9420377968, गणेश राऊत 9422376702, अमित नामुष्टे – 9028455667, दीपक नलावडे 9226025777 JCI Festival 2026 अंतर्गत आयोजित ही नृत्यस्पर्धा खेड परिसरातील नृत्यप्रेमींसाठी एक मोठे आकर्षण ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg