loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात जिल्हा परीषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - जिल्हा परीषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. उमेदवार गावोगाव वाडीवर जाऊन मतदारांना भेटून मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. शिवसेना आणि महाविकास आघाडी याच्यात दुरंगी लढत आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तितकीच शिवसेना पक्षाकडूनही प्रतिष्ठेची केली आहे. लांजा तालुक्यात चुरशीच्या लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. लांजात काही ठीकाणी ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना या दोन शिवसेना पक्षात प्रमुख लढत होणार आहे. शिवसेना पक्षाच्या उमेदवरांच्या विजयाची धुरा ही आमदार कीरण सामंत यांच्याच खांद्यावर असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

4 जिल्हापरिषद आणि 8 पंचायत समिती मतदार संघात निवडणुक असुन प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पक्षाची मते स्थानिक पातळीवरील गावातील संबध या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबविण्यात जास्त भर उमेदवारांकडून दीला जात असल्याचे बोलले जाते. महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांना वाढता पाठींबा मिळत असुन काही जागांवर विजय संपादन केला जाईल असे सध्या वातावरण असल्याचे काही राजकीय तज्ञ व्यक्तीतुन बोलले जात आहे. तसेच शिवसेना पक्षाकडून पदे भूषविलेल्या काहींना पुन्हा उमेदवारी दिल्याने मतदार संघातील नाराजीचा फटका शिवसेना पक्षाला बसण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळातून चर्चिले जात आहे. मात्र महाविकास आघाडीकडे तालुक्यात खमक्या नेतृत्वाचा अभाव असल्यामुळे उमेदवार निवडून आणणे तितकेसे सोपे राहीले नसल्याचे बोलले जात आहे.

टाइम्स स्पेशल

दरम्यान लांजा तालुक्यात आमदार कीरण सांमत यांनी विकास कामांचा धडाका सुरु केला आहे. आमदार कीरण सामंत यांच्याच माध्यमातून गावा गावात केलेली विकास कामे आणि आमदार कीरण सामंत यांचे नेतृत्व स्वीकारून मोठ्या प्रमाणात शिवसेनेत झालेला पक्ष प्रवेश यामुळे शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना विजय मिळविणे कठीण नसल्याचे बोलले जात आहे. आमदार कीरण सामंत यांनी या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरकस प्रयत्न सुरू केले असल्यामुळे या निवडणुकीतीच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg