loader
Breaking News
Breaking News
Foto

वरची देवली येथे आयोजित पाककला स्पर्धेत श्रीशा चव्हाण प्रथम

मालवण (प्रतिनिधी) - मकर संक्रांत व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वरची देवली गावातील महिलांसाठी तांदळापासून पदार्थांवर आधारित विशेष पाककला स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत श्रीशा चव्हाण (शिरवाळे व रस) यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर द्वितीय क्रमांक स्नेहल चव्हाण (तांदुळपीठाचे स्प्रिंग मोमोज) व तृतीय क्रमांक जान्हवी गोवेकर (भिजवलेल्या तांदळाचे पकोडे व चटणी) यांनी मिळवला. वरची देवली येथील सौ. प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण १६ महिलांनी सहभाग घेतला. कोकणाची ओळख असलेला तांदूळ आणि त्यापासून तयार होणारे विविध पारंपारिक व नावीन्यपूर्ण पदार्थ ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती. यावेळी स्पर्धकांनी तांदळापासून विविध पदार्थ सादर करत प्रजासत्ताक दिन व मकर संक्रांतीचे औचित्य साधून आकर्षक सजावटही केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेचे परीक्षक आणि मुख्य अतिथी म्हणून तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष, देवबाग येथील पर्यटन व्यावसायिक व शेफ सहदेव साळगावकर उपस्थित होते. देवली मधील महिलांनी खऱ्या अर्थाने गावपण टिकवून ठेवले आहे, असे प्रशंसोद्गार साळगावकर यांनी काढले. तसेच सर्वांत लहान स्पर्धक श्रेया चव्हाण व सर्वांत ज्येष्ठ स्पर्धक दक्षता चव्हाण यांचेही कौतुक केले. बक्षीस वितरण समारंभात विजेत्यांना ट्रॉफी व बक्षिसे प्रदान करण्यात आली. उर्वरित सर्व सहभागी महिलांना स्नेहभेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ऊर्जा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुमेधा नाईक, माजी सरपंच गायत्री चव्हाण, देवली ग्रामसंघाच्या अध्यक्षा मधुरा गोवेकर व सी.आर.पी. मंजुषा मेस्त्री उपस्थित होत्या.

टाइम्स स्पेशल

डॉ. सुमेधा नाईक यांनी गावातील महिलांनी पर्यटन व्यवसायाशी संलग्न क्लाउड किचन संकल्पना राबवावी, असे आवाहन केले. स्पर्धेसाठी चव्हाण कुटुंबीयांनी केलेली सजावट लक्षवेधी ठरली. स्पर्धा आयोजनासाठी नरेश चव्हाण, ओंकार चव्हाण, सौरभ चव्हाण, प्रिया चव्हाण व डॉ. सुमेधा नाईक यांनी विशेष योगदान दिले. सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg