loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली भेडशी पंचायत समिती महायुती उमेदवार संजय सातार्डेकर यांचा जोरदार प्रचार

दोडामार्ग (प्रतिनिधी) - साटेली भेडशी पंचायत समिती भाजपा-शिवसेना महायुती उमेदवार संजय सातार्डेकर यांनी पंचायत समिती मतदार संघात गावात भेटी देऊन आपला प्रचार सुरू केला आहे. अनेक गावात मतदारांच चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुती सरकारच्या माध्यमातून या मतदार संघात झालेल्या विकास कामामुळे तसेच उर्वरित विकास कामे भाजपा शिवसेना महायुती करु शकते हे लक्षात घेऊन मतदार महायुती मागे उभे आहेत यामुळे आपण या मतदार संघातून भरघोस मतांनी निवडून येणार असे पंचायत समिती महायुती उमेदवार संजय सातार्डेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या गावच्या समस्या सुटल्या पाहिजे तर महायुती शिवाय पर्याय नाही. आज केंद्रात राज्यात महायुती सरकार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती वर महायुती सत्ता आली तर आपल्या गावचा विकास जलदगती कसा होईल, हे पटवून देत आहेत. कार्यकर्त्यांची मोठी फळी संजय सातार्डेकर यांच्या मागे आहे. असे त्यांनी सांगितले. मतदार संघात जनतेचा मिळत असलेला प्रतिसाद यावरून आपण निवडून येणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg