loader
Breaking News
Breaking News
Foto

झेप फाऊंडेशन रत्नागिरी संस्थेतर्फे तालुकास्तरीय निबंध स्पर्धेसाठी आवाहन

रत्नागिरीः झेप फाऊंडेशन रत्नागिरी शैक्षणिक व सामाजिक संस्था(रजि.)च्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय गटासाठी रत्नागिरी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 29 जाने. 2026 पर्यंत निबंध पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर निबंंध स्पर्धा गट क्र. 1 (इ. 5 वी ते 7 वी) साठी ‘प्रजासत्ताक दिनाचे महत्व’ किंंवा ‘मी भारतीय संविधान बोलत आहे’ असे विषय आहेत. तसेच गट क्र. 2 (इ. 8 वी, 9 वी)साठी ‘मी लोकप्रतिनिधी झालो तर...‘ किंवा ‘प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची माजी कल्पना’ असे विषय राहतील. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रू. 2222/- आकर्षक चषक व प्रमाणपत्र, व्दितीय पारितोषिक रू. 1555/-आकर्षक चषक व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रू. 1111/- आकर्षक चषक व प्रमाणपत्र तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान स्पर्धकांनी वरील एका विषयावर स्वहस्ताक्षरात व कागदाच्या एका बाजूला निबंध लिहावा, दोन्ही गटासाठी शब्दमर्यादा 700 शब्द राहिल. स्पर्धकाने स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता व पालकांचा मोबाईल नंबर स्वतंत्र कागदावर लिहून सोबत जोडावा. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमाक प्राप्त विजेत्यांना संपर्क नंबरव्दारे कळविले जाईल. बक्षिस वितरण समारंभाची तारिख, ठिकाण व वेळ आयोजकांतर्फे कळविण्यात येईल.

टाइम्स स्पेशल

स्पर्धकांनी आपले निबंध दि. 29 जाने. रोजी सायं. 7. 30 वा.पर्यंत अ‍ॅप्पल ब्लॉसम, रामआळी, रत्नागिरी येथे पोहचतील, असे पाठवावे. अधिक माहितीसाठी व संपर्कसाठी परशुराम उर्फ दादा ढेकणे(अध्यक्ष)-9422432656, सुनिल पवार(सचिव)-9158511517, सचिन गांधी(उपाध्यक्ष)-9404846454 यांच्याशी संपर्क साधावा.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg