loader
Breaking News
Breaking News
Foto

रानडुक्कर शिकार प्रकरण संशयिताच्या वनकोठडीत एका दिवसाची वाढ; मुख्य सूत्रधार अद्याप पसार

खेडः खेड तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात झालेल्या रानडुक्कर शिकार प्रकरणातील संशयित आरोपी बाबू भागोजी शिंदे याच्या वनकोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. या खळबळजनक प्रकरणातील दोन मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाले असून वन विभागाच्या विविध पथकांकडून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे. या दोघांच्या अटकेनंतरच या शिकार रॅकेटमध्ये आणखी कोणाचे हात गुंतले आहेत, याचा सविस्तर उलगडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काडवली परिसरामध्ये वन विभागाच्या पथकाकडून व्याघ्र गणनेचे काम सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला होता. दोन रानडुक्कर मृतावस्थेत घेऊन जात असलेल्या तिघांना वन कर्मचाऱ्यांनी पाहिले आणि त्यांचा पाठलाग केला. यावेळी बाबू शिंदे याला रंगेहाथ पकडण्यात यश आले, मात्र त्याचे इतर दोन साथीदार जंगलाचा फायदा घेत पसार झाले. अटकेत असलेल्या शिंदे याच्याकडून तब्बल ९६ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. या शिकारीच्या मागे मोठे रॅकेट असण्याची दाट शक्यता असून पसार आरोपींच्या शोधासाठी वन विभागाने चक्राकार हालचाली सुरू केल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश पाटील, खेडचे वनपाल उदय भागवत व त्यांचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पसार झालेल्या मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी वन विभागाचे कर्मचारी विविध भागात धाडी टाकत असून लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg