loader
Breaking News
Breaking News
Foto

आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांना मुंबईच्या महापौरपदासाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते पुढे म्हणाले, मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल. आमची युती आहे. त्यांच्यासारखी याला खड्‌ड्यात घाल, त्याला खड्‌ड्यात घाल अशी युती नाही. खुर्ची व सत्ता हा आमचा अजेंडा नाही. आम्ही मुंबईकरांना काय देणार हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण, मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. आता या ५ वर्षांत आम्ही मुंबई जागतिक पातळीवरील शहरासारखी करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार, मुंबई हे जागतिक आर्थिक केंद्र झाले पाहिजे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पण विरोधकांनी लगेचच मुंबईला तोडण्यात येणार असल्याची ओरड करण्यात आली. पण मराठी माणूस तुमच्यामुळे मुंबईबाहेर फेकला गेला. मुंबईकरांना जीवनात काय मिळणार हा आमचा अजेंडा आहे. आता मनसेही आमच्यासोबत येत आहे. मनसेने विकासाच्या मुद्यावर आम्हाला साथ दिली. आमच्यात महापौरपदासाठी कोणतीही रस्सीखेच नाही. बहुमत नसणार्‍यांनी स्वप्ने पाहणे चुकीचे आहे, असे शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आज बाळासाहेबांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोणता प्रस्ताव, काय प्रस्ताव? आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईत शिवसेना भाजप महायुतीचा महापौर होत आहे. भाजप व शिवसेना ही आताची युती नाही. ती बाळासाहेब, अटलजी व अडवाणींच्या काळातील युती आहे. एनडीएमध्ये आम्ही सोबत आहोत. महायुतीमध्ये सोबत आहोत. त्यामुळे विचारधारेबरोबर आम्ही आहोत.

टाइम्स स्पेशल

ते पुढे म्हणाले, मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल. आमची युती आहे. त्यांच्यासारखी याला खड्‌ड्यात घाल, त्याला खड्‌ड्यात घाल अशी युती नाही. खुर्ची व सत्ता हा आमचा अजेंडा नाही. आम्ही मुंबईकरांना काय देणार हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. कारण, मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे. आता या ५ वर्षांत आम्ही मुंबई जागतिक पातळीवरील शहरासारखी करणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईला फिनटेक कॅपिटल करण्याचा शब्द दिला आहे. त्यानुसार, मुंबई हे जागतिक आर्थिक केंद्र झाले पाहिजे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना आता स्वतः एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोणता प्रस्ताव? काय प्रस्ताव? आम्हाला कुणाच्याही प्रस्तावाची गरज नाही. मुंबईत शिवसेना भाजप महायुतीचाच महापौर होत आहे, असे ते म्हणालेत. आजपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे. या ऐतिहासिक वर्षात मुंबई महापालिकेवर भगवा फडकवावा व शिवसेनेचाच महापौर व्हावा अशी आग्रही मागणी शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. पण भाजपने ८९ जागांसह महापौर पदावर आपला हक्क सांगितल्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या महापौरपदाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी वरील भूमिका व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

मुंबईत महायुतीचाच महापौर होईल, एकनाथ शिंदेंनी फेटाळला ठाकरेंच्या भास्कर जाधवांचा प्रस्ताव

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg