loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना तालुका शिवसेनेच्यावतीने अभिवादन

दापोली (प्रतिनिधी) - हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दापोली शहरातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या तालुका संपर्क कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या अभिवादनाच्या कार्यक्रमाला दापोली शहर प्रमुख संदिप चव्हाण, उपशहर प्रमुख विक्रांत गवळी, जनार्दन हळदे, प्रसाद ऊर्फ दादा कळसकर, विनोद शेडगे आदींसह शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या धगधगत्या जीवनपटाचा संक्षिप्त आढावा घेत बाळासाहेबांच्या पश्चात ख-या अर्थाने त्यांचे हिंदूत्व आणि विकासाच्या ध्येयदृष्टिचे विचारच आपल्या सर्वांना मार्गदर्शक ठरतात. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतील शिवसेना त्याच तडफेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत, त्यांना साथ देण्याचे काम आपण सगळ्यांनीच केले पाहिजे असे ते म्हणाले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg