loader
Breaking News
Breaking News
Foto

न.प.च्या पहिल्याच मासिक बैठकीत पदाधिकारी आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांमध्ये खडाजंगी

रत्नागिरी - रत्नागिरी न.प.च्या निवडणुकीनंतर शुक्रवारी पहिल्याच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होतं. या मासिक सभेत पदाधिकार्‍यांनी प्रशासकीय कामकाजाचे वाभाडे काढले. उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी स्वच्छ भारत अभियानातील स्वच्छतागृहाचा ४ कोटींचा घोटाळा चव्हाट्यावर मांडला तर नगरसेवक निमेष नायर यांनी महानगर गॅसने खोदाईच्या पैशात केलेला ३० लाखांचा घोटाळा समोर आणत नगराध्यक्षांसमोर प्रश्‍न उपस्थित केला. महानगर गॅस ही कंपनी तुमच्या जावयाची का? असा प्रश्‍न उपस्थित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शहरातील नागरिकांचे आरोग्य जपणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांसाठी नगरपालिका नेमकी काय करते? असा प्रश्‍न नगरसेवक विजय खेडेकर यांनी उपस्थित केला. न.प.प्रशासनातील गेल्या चार वर्षाचा लेखाजोखाच या बैठकीत विचारण्यात आला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीमुळे नगरपालिकेची पहिलीच मासिक सभा चांगलीच वादळी ठरली. नगरपालिकेच्या कारभाराच्या संदर्भात प्रश्‍न विचारुन आम्ही व्हिलन ठरलो तरी चालेल, असे मत यावेळी सर्वच पदाधिकार्‍यांनी व्यक्त केले. न.प.ची खालावलेली आर्थिक स्थिती पाहता आम्हाला बैठकीचा भत्ता ही नको आणि चहापाणीही नको, असा निर्णय सर्वच पदाधिकार्‍यांनी घेतला. आज उपस्थित केलेल्या सर्व प्रश्‍नांची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्‍वासन नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी दिले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg