loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा शहर च्या वतीने सहाशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका कोकण रहिवासी मंच दिवा शहर या माझ्या संस्थेच्या वतीने शनिवार दिनांक 17 जानेवारी रोजी कुळवंडी ऐनवरे गुणदे शेल्डी हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे अंजनी (आयनी)कोरेगाव गावातील सर्व शाळा जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना दप्तर पेन पेन्सिल वह्या लागेल ते साहित्य असा शैक्षणिक उपक्रम सदर मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. संस्थेला आपल्या गावापर्यंत नेऊन सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल, तसेच नेत्रदीपक कार्याची पोचपावती म्हणून कुळवंडी गावातील आमचे पदाधिकारी संतोष दादा खोत निकम, विशाल निकम, सुधीर चोरगे, गुणदे गावामध्ये शिक्षणप्रेमी कृष्णकांत जंगम गुरुजी, हुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे विद्यालय आयनी मधील सुपुत्र शाहीर रत्नाकर महाकाळ बुवा, यांचा विशेष गौरव करण्यात आला, पदाधिकारी रुपेश करजवकर, कल्पेश करजवकर, तसेच कोरेगाव गावामध्ये विशाल विठोबा देवळे, आशिष बुरटे या मंडळींचा संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याप्रसंगी संस्थेच्या वतीने कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सतीश सहदेव निकम, सचिव निलेश शांताराम पाटणे, खजिनदार संदेश नथुराम कदम, कार्याध्यक्ष संतोष दादाखोत निकम, प्रवक्ता प्रवीण केशव उतेकर, उपाध्यक्ष दीपक सदानंद उतेकर, सल्लागार ओंकार चाळके, मंगेश शेलार, शरद शिबे, विजय गोगावले, सहसचिव विशाल विठोबा देवळे, सहखजिनदार हरेश लाड, रोशन आंब्रे, सहकार्याध्यक्ष प्रवीण कदम, सह संपर्कप्रमुख अशोक कदम, कार्यालय प्रमुख सुधीर निकम, दयानंद पडवळ, कमिटी सदस्य रुपेश करजवकर, अमोल जाधव, राकेश कदम, विशाल निकम, सुधीर चोरगे, आशिष बुरटे, ज्ञानेश्वर कदम, दिनेश पास्ते, सुयश निकम, कल्पेश करजवकर, दर्शन शेलार इत्यादी मंडळी उपस्थित होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg