loader
Breaking News
Breaking News
Foto

पेढे येथे चोरट्यांचा धुमाकूळ; दोन फ्लॅट फोडले

चिपळूण : शहरालगतच्या पेढे वडकर कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, भास्कर उमाजी मंडले (वय ३६, व्यवसाय – नोकरी) हे पेढे, वडकर कॉलनी येथील रूम नं. बी-१० येथे भाड्याने वास्तव्यास आहेत. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाज्याचा कडी-कोयंडा कोणत्यातरी हत्याराच्या साहाय्याने कट करून उचकडत दरवाजा उघडला. त्यानंतर फ्लॅटमध्ये प्रवेश करून कपाटात ठेवलेली ₹२७,७५०/- किमतीची सोन्याची बोरमाळ लबाडीच्या इराद्याने चोरून नेली. याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर राहणारे संजय पवार यांच्या फ्लॅटचाही दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या परिसरात एकाच रात्रीत दोन घरांमध्ये चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २७/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता कायदा २०२३ चे कलम ३०५, (क), ३३१(४) अन्वये अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी पाहणी करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg