loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायतीत अपक्ष निवडून आलेले रफिक नेवरेकर झाले पाणीपुरवठा सभापती

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक रफिक नेवरेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. लांजा नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ९ मधून रफिक नेवरेकर हे सन २०२० आणि २०२५ अशा सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. २०२० ते २०२५ या कालावधीत त्यांनी प्रभागात राबवलेली विकासकामे, नागरिकांशी असलेला सततचा संपर्क, कोरोना काळात केलेले काम आणि रात्रीअपरात्रीही नागरिकांसाठी धावून जाण्याची तत्परता यामुळेच यंदाच्या देखील निवडणुकीत त्यांनी सव्वाशे मतांच्या मताधिक्याने एकहाती विजय मिळवला. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून विजय मिळवणार्‍या रफिक नेवरेकर यांनी यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवूनही तेवढ्याच मताधिक्याने विजय मिळवला. यावरून त्यांचा प्रभागातील नागरिकांशी असलेला भक्कम आणि विश्वासार्ह जनसंपर्क पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर रफिक नेवरेकर यांनी आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखालील लांजाकुवे नगरपंचायतीच्या शिवसेना शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला. त्यानंतर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापतीपद त्यांच्या वाट्याला आले. याबाबत बोलताना रफिक नेवरेकर म्हणाले की, नगरसेवक म्हणून मी माझ्या प्रभागापुरते काम करत होतो. मात्र आता पाणीपुरवठा सभापती म्हणून लांजा-कुवे नगरपंचायत हद्दीतील सर्व १७ प्रभागांतील नागरिकांचे पाणीविषयक प्रश्न प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी कटिबद्ध राहीन. त्याचप्रमाणे आमदार किरण सामंत यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. तसेच प्रभागातील जनतेने निवडून दिल्यामुळेच मी या पदावर पोहोचलो असे सांगत त्यांनी मतदारांचे आभार मानले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg