loader
Breaking News
Breaking News
Foto

आठवडाभरात मुंबईला नवा महापौर मिळणार! जोरदार राजकीय हालचाली

मुंबई. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवसांत भाजप आणि शिवसेना (महायुती) अधिकृत गट स्थापन करण्याची शक्यता आहे. गट स्थापन झाल्यानंतर महापौर निवड, उपमहापौर निवड तसेच स्थायी समितीसह इतर महत्त्वाच्या समित्यांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पालिका नियमांनुसार गट स्थापन झाल्यानंतर सात दिवसांच्या आत महापौर निवडीसह सत्तास्थापनेच्या औपचारिक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे येत्या आठवडाभरात मुंबईला नवा महापौर मिळण्याची दाट शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

महानगरपालिकेत प्रथम सर्व पक्षांकडून अधिकृत गटनेत्यांची नियुक्ती केली जाते. त्यानंतर महापौरपदासाठी अर्ज मागवले जातात. सभागृहात बहुमत सिद्ध करत महापौर आणि उपमहापौर निवडले जातात. त्यानंतर स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समितीसारख्या महत्त्वाच्या समित्यांची स्थापना केली जाते. या समित्यांमधूनच मुंबईच्या कारभाराचे मुख्य निर्णय घेतले जातात. भाजप-शिवसेना महायुतीकडे बहुमत असल्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. मात्र महापौरपद कोणाकडे जाणार, उपमहापौरपदाची विभागणी कशी होणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg