loader
Breaking News
Breaking News
Foto

तारकर्ली वरचीवाडी येथे मासेमारी नौकेला आग, साहित्य जळून खाक

मालवण (प्रतिनिधी) - तारकर्ली वरचीवाडी येथील मच्छिमार भालचंद्र उर्फ दाजीबा जनार्दन कुबल यांची किनार्‍यावर उभी करून ठेवलेली मासेमारी नौका (छोटी पात) आज सकाळी जळालेल्या अवस्थेत दिसून आली असून आगीत नौकेसह नौकेतील मासेमारी जाळी व इतर साहित्य जळून खाक झाल्याने कुबल यांचे २ लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तारकर्ली किनार्‍यावर मच्छिमार भालचंद्र कुबल यांची श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न (आयएनडी एमएच ५ एमएम ३४८०) ही मासेमारी नौका उभी करून ठेवण्यात आली. आज पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही नौका किनार्‍यावर जळालेल्या अवस्थेत दिसून आली. नौकेतील मासेमारी जाळी व इतर साहित्य देखील जळून खाक झाले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नव्हते.

टाइम्स स्पेशल

तारकर्ली येथील मच्छीमार भालचंद्र कुबल यांच्या मासेमारी नौकेला आग लागून नुकसान झाल्याचे समजताच शिवसेनेचे मच्छीमार सेलचे जिल्हाप्रमुख राजा गांवकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास कृष्णा गांवकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर, मच्छिमार सेलचे तालुकाप्रमुख भाऊ मोरजे यांनी तारकर्ली येथे जाऊन सदर घटनेची पाहणी करून कुबल यांना धीर दिला. आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून लागेल ती मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन यावेळी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कुबल यांना दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg