loader
Breaking News
Breaking News
Foto

ह.भ.प. कृष्णा महाराज फाळके(खेर्डी) यांचे दुःखद निधन

चिपळूण दि. 2फेब्रु. :- खेर्डी गावाचे तसेच पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील जेष्ठ व्यक्तिमत्त्व ह.भ.प. कृष्णा महाराज फाळके* यांचे दुःखद निधन झाले आहे. ह भ प कृष्णा महाराज हे खेर्डी व पंचक्रोशीतील विविध ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनसेवा बजावत असत. त्यांच्या ओघवत्या वाणीतील कीर्तनरूपी सेवेने संपूर्ण पंचक्रोशीमध्ये त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात होते...तसेच त्यांनी महावितरण (वीज वितरण कंपनी) येथे कर्मचारी म्हणून प्रामाणिकपणे शासकीय सेवा बजावून निवृत्ती घेतली होती. सामाजिक, आध्यात्मिक व शासकीय अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपले योगदान दिले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय, खेर्डी गाव व संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg