वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीचे उमेदवार प्रमोद गांधी हे विक्रमी मतांनी निवडून येतील असा विश्वास मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी पत्रकारांजवळ व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष व शृंगारतळी जिल्हा परिषद गटातून मनसेच्या रेल्वे इंजिन चिन्हावरती निवडणूक लढवणारे प्रमोद गांधी यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व मनसे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी असल्याने तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते प्रमोद गांधी यांना निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत.
आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा सह शृंगारतळी जिल्हा परिषद गटामध्ये करोडो रुपयाची केलेली विकास कामे यामुळे या गटातील मतदार नक्कीच प्रमोद गांधी यांना मतदानाच्या रूपाने सहकार्य करतील. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे प्रमोद गांधी यांना पराजय स्वीकारावा लागला होता. परंतु जरी त्यांचा पराजय झाला असला तरीसुद्धा त्यांनी तालुक्यामध्ये स्वनिधीतून अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत. गोरगरीब जनतेला त्यांचा सदैव मदतीचा हात पुढे असतो. शृंगारतळी ही राजकारणाचे प्रमुख केंद्रबिंदू आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील व महत्वाचा जिल्हापरिषद गट म्हणून यावेळी शृंगारतळी नावारूपाला आली आहे. अशा गटातून प्रमोद गांधी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व मनसे युतीकडून जिल्हापरिषदेसाठी उमेदवारी मिळाली आहे. आ. भास्कर जाधव यांचे सहकार्य व कार्यक्त्यांची मोठी फौज त्यांच्याबरोबर असल्याने प्रमोद गांधी यांचा विजय कोणीही रोखू शकणार नाही.
आता जिल्हापरिषद निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरले आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी असल्याने यावेळी ते नक्की येथून विजय मिळवतील, प्रमोद गांधी यांनी गुहागर तालुक्यामध्ये रक्तदान शिबीर, नेत्र तपासणी शिबिर आरोग्य शिबिर तसेच एक समाज एक संघ अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजाला एकत्र आणण्याचे महत्वपूर्ण काम केले. कोरोना काळामध्ये गोरगरीब निराधार व गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले काहींना आर्थिक मदत देखील त्यांनी केली. मुंबईसारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या लोकांना त्यांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्याचप्रमाणे स्थानिक तरुणांचा रोजगाराचा मुद्दा असे असंख्य उपक्रम त्यांनी हाती घेतले होते. त्यामुळे घराघरात त्यांनी आपुलकीचे नाते निर्माण केले आहे. त्यामुळे शृंगारतळी या जिल्हा परिषद गटातील मतदार त्यांच्या कार्याची पोच पावती नक्कीच मताच्या रूपात देतील, असा विश्वास विनोद जानवळकर यांनी व्यक्त केला आहे.














































































































.jpg)
































































.jpg)


















































































































































































































































































































































.jpg)















































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.