loader
Breaking News
Breaking News
Foto

हातिस येथील पीर बाबांचा २,३ फेब्रु.ला उरूस

रत्नागिरी (वार्ताहर) - कोकणात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिध्द असलेला तालुक्यातील हातिस येथील श्री पीर बाबरशेख बाबांचा उरूस दि. २ व ३ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. हातिस गावातील पीर बाबरशेख बाबांचा उरूस हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिध्द असून नवसाला पावणार म्हणून पीर बाबांची ख्याती आहे. श्री पीर बाबरशेख बाबांच्या दर्शनासाठी कोकणातील कानाकोपर्‍यातून बाबांचे भाविक दरवर्षी मोठया संख्येने उपस्थित असतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या यात्रेला बाबांच्या दर्शनाला आलेल्या बाबांच्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते. समस्या, अडचणीतून पीर बाबांच्या दर्शनाने हमखास मार्ग निघतो, असा भक्तांना विश्‍वास आहे. नवस करणेे व नवस फेडणे यासाठी विशेष गर्दी असते. गतवर्षी बाबांसमोर मांडलेली इच्छा पूर्ण झाल्याने पूढील वर्षी तो नवस फेडण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. यासाठी नवस करणे व नवस फेडणे अशा स्वतंत्र रांगा केलेल्या असतात. तसेच दर्शनासाठी वेगळी रांग असते. हातिस यात्रेसाठी भाविकांची होणारी अलोट गर्दी लक्षात घेता त्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होवू नये, यासाठी हातिस ग्रामविकास मंडळाच्यावतीने योग्य ती दक्षता घेतली जाते. एस. बस, खाजगी वाहने यांची स्वतंत्र पार्किग व्यवस्था मंडळाकडून दरवर्षी केली जाते. हातिस ग्रामविकास मंडळाच्या अत्यंत सुयोग्य नियोजनामुळे यात्रा सुरळीत व शांततामय वातावरणात पार पडते. यात्रेला भाविकांची होणारी अलोट गर्दीचा विचार करता एस. टी. महामंडळाकडून जादा बसेस सोडल्या जातात, यातून महामंडळाला जादा उत्पन्न मिळते. महामंडळाकडून एस. टी. बसस्थानक आवारात स्वागत बॅनर व विशेष संगीत लावले जाते. गिलाफ घेऊन निघते वेळी गावच्या पटांगणात शस्त्रास्त्रांचा खेळ केला जातो. हा खेळ पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी असते. चित्तथरारक असे शस्त्रास्त्रांचे खेळ पाहून अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg