loader
Breaking News
Breaking News
Foto

मोठी बातमीः उच्च न्यायालयाच्या कठोर शब्दांचा परिणाम; महाड राडा प्रकरणात मुख्य आरोपी विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून, मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटक न झाल्याबाबत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीदरम्यान सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्र सादर केली जातात, अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली. याच सुनावणीत मुख्यमंत्री आणि मंत्री भरत गोगावले यांच्याकडून थेट निर्देश घ्या, अशा स्पष्ट सूचना न्यायालयाने सरकारला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर होणे ही बाब अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणात विकास गोगावले यांच्यासह त्यांचे पुतणे महेश गोगावले, माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीयांश जगताप यांच्यावरही गुन्हे दाखल आहेत. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही या आरोपींना अटक होत नसल्यामुळे पोलिस यंत्रणेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. सरकार वेळकाढूपणा करत आहे का, असा थेट सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. त्यामुळे पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव आहे की काय, अशी चर्चा राज्यभर सरू झाली होती.

टाइम्स स्पेशल

महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गाजलेल्या राडा प्रकरणात आज महत्त्वाची घडामोड घडली असून, मुख्य आरोपींपैकी एक असलेले विकास गोगावले हे अखेर महाड पोलिस ठाण्यात हजर झाले आहेत. कालच या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आरोपींना अटक न झाल्याबाबत राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र असलेले विकास गोगावले यांच्यासह इतर आरोपी मोकाट असल्याने न्यायालयाने सरकारची भूमिका संशयास्पद असल्याचं स्पष्टपणे नमूद केलं होतं. न्यायालयाच्या या कठोर निरीक्षणानंतर अवघ्या 24 तासांत विकास गोगावले पोलिस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.मुंबई उच्च न्यायालयाने काल सुनावणीदरम्यान सरकारला अक्षरशः धारेवर धरलं होतं. मुख्यमंत्री इतके असहाय्य झाले आहेत की त्यांना काहीच करता येत नाही, अशा शब्दांत न्यायालयाने संताप व्यक्त केला होता. अटक करायची असेल तर 24 तासांत कोणालाही अटक होऊ शकते, पण अटक करायची नसली की प्रतिज्ञापत्रं सादर केली जातात, अशी बोचरी टिप्पणी करत न्यायालयाने सरकारची गंभीरता तपासली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg