loader
Breaking News
Breaking News
Foto

भिम युवा पँथरच्या ‘संविधान चषक-२०२६’चा मानकरी ठरला यंगस्टार सोमेश्‍वर संघ

रत्नागिरी (वार्ताहर) - भिम युवा पँथर रत्नागिरी(रजि.) आयोजित भव्य ‘संविधान चषक-२०२६’ क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद यंगस्टार सोमेश्‍वर बौध्दवाडी संघाने पटकाविले. ‘संविधान चषक-२०२६’ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना यंगस्टार सोमेश्‍वर बौध्दवाडी व भैरीजुगाई मुरूडवाडा या संघामध्ये झाला. प्रथम फलंदाजी करताना यंगस्टार सोमेश्‍वर संघाने भैरीजुगाई मुरूगवाडा संघासमोर ७२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भैरीजुगाई संघ ५३ धावा करू शकल्याने यंगस्टार सोमेश्‍वर संघ अंतिम विजेता तर भैरीजुगाई संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघा २६ हजाराचे रोख पारितोषिक व आकर्षक भव्य ‘संविधान चषक’ तर उपविजेत्या संघाला १६ हजाराचे रोख पारितोषिक व चषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सामनावीर म्हणून हर्षल पवार यांला गौरविण्यात आले. हर्षल पवार उत्कृष्ट फलंदाज तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अंकित पवार ठरले. भैरीजुगाई संघाचा खेळाडू अफ्रीद जाऊ याला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. मॅन ऑफ दी सिरीज भैरीजुगाई संघाचा स्मिथ ठरला. व्यासपीठावरील मान्यवर विजय मोहिते, प्रकाश पवार, राजू जाधव, सिध्दार्थ, कांबळे, दिपक जाधव यांच्या हस्ते संघांना व खेळांडूना गौरविण्यात आले. संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी भिम युवा पँथरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg