loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री साई मंदिर कोतवडे २८वा वर्धापनदिन सोहळा

रत्नागिरी - श्री साई मंदिर कोतवडे यांच्यावतीने साईमंदिरात २८वा वर्धापनदिन उत्साहात दि.२२ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत संपन्न होत आहे. या सोहळ्यानिमित्त प.पू.रत्नाकार महाराज यांच्या प्रेरणेने व संतकवी दासगण महाराज, प.पू.वासुदेवानंद सरस्वती, श्री बाबा महाराज सहस्त्रबुद्धे, प.पू. तात्यासाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या आशिर्वादाने या सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु.दि.२९ जाने.२०२६ रोजी सायं.७ वा. दत्तगुरु सेवा मंडळ रत्नागिरी- गायनसेवा, शुक्र.३० जाने.२०२६ श्री संभाजी शिवाजी वराळे, शिरडी राहुरी व श्री संजय दिगंबर गायकवाड ता.शिरुर जि.पुणे यांचे साई अनुभव- रात्रौ ७. वा. भजन सेवा, शनि.दि.३१ जाने.२०२६ रोजी दु.१२ वा. मध्यान्ह आरती, दु.१वा. भजन, साई सेवा महिला मंडळ वायंगणकरवाडी आंबेशेत, दु.१ ते ३ महाप्रसाद, सायं.५ वा.पालखी उत्सव.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दि.२९,३०,३१ जाने.२०२६ पहाटे ५.५५मि.श्रींची काकडआरती, श्रींचे मंगलस्नान, धार्मिक कार्यक्रम, नामस्मरण, दु.१२ ते १२.१५ मध्यान्ह आरती, रात्रौ १० वा. शेजआरती असे कार्यक्रम आयोजित आहेत. तरी या उत्सव सोहळ्यास सहकुटुंब, मित्रमंडळींसह उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साई मंदिर कोतवडेतर्फे करण्यात आले आहे. जशीे जमेल तशी प्रत्येकाने नामस्मरण सेवा करावी, असे सूचित करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg