loader
Breaking News
Breaking News
Foto

लाडक्या बहिणींसाठी मोठी गुडन्यूज, मंत्री अदिती तटकरेंचा केवायसीबाबत नवा आदेश

मुंबई. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक प्रमुख कल्याणकारी योजना आहे ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मदत मिळताता. मात्र, या योजनेत काही अपात्र उमेदवारांनी अर्ज भरल्यामुळे सरकारने सर्व लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आवाहन केले होते. याची अंतिम तारीख 31 डिसेंबर होती. या केवायसीत काही तुत्री झाल्याच्या तक्रारी येत असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती. तथापि, काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.” असे ट्वीट अदिती तटकरे यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg