loader
Breaking News
Breaking News
Foto

ईच्छापूर्ती गणेश मंदिरात आरोग्यविषयक वैद्यकीय तपासण्यांनी माघी गणेशोत्सवाला सुरुवात

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातून जालगाव महालक्ष्मी मंदीराकडे जाणा-या मार्गावरील श्री ईच्छापूर्ती गणेश मंदिर आहे. सर्वांचे श्रध्दास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षीच अगदी मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रमांसह विविध प्रकारच्या सांस्कृतिक, क्रिडा, शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनाने माघी गणेशोत्सव साजरा करण्याची येथील मंडळाची एक जूणीच परंपरा आहे. अशा देवस्थानचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.त्यामुळे यावर्षी माघी गणेशोत्सवानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशा या श्री सिध्दी ईच्छापूर्ती गणेश मंडळ महालक्ष्मी रोड दापोली ने यावर्षीच्या माघी गणेशोत्सवाची सुरुवात रक्तदान शिबीर, रक्त तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी आदी आरोग्यविषयक मोफत तपासणी शिबिराच्या सामाजिक बांधिलकीच्या कामाने मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुधवारी २१ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. पासून श्री गणेश याग (होम हवन), सायंकाळी ४ ते ६ वाजता मंडळातील मुली, मुले आणि महिलांसाठी फनी गेम, सांय. ६ ते रात्रौ ८ वा. गुहागर धोपावे येथील कालिका माता महिला प्रासादिक भजन मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९ ते १० या दरम्यानच्या कालावधीत कोंडविलकर बंधू आणि मंडळी यांच्या सप्तरंगी फोक वाणी प्रस्तूत सन्मान मातीचा सन्मान मराठीचा हा गायनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर माघी गणेशोत्सवाच्या मुख्य दिवशी गुरुवारी २२ जानेवारी २०२६ रोजी श्रीगणेशोत्सव सोहळा सकाळी ६ ते ७.३० मंडळातर्फे श्री गणेश महाअभिषेक, सकाळी ७.३० ते ८.३० वा.श्री गणेश आवर्तन, सकाळी १० ते दुपारी १२ वा. गिम्हवणे येथील सुप्रसिध्द किर्तनकार ह.भ.प. अवधूत जोशी बुवा यांचे श्री गणेश जन्मकाळाचे किर्तनाचा कार्यक्रम, दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्मकाळ / प्राणप्रतिष्ठा, दुपारी १२.३० ते दुपारी १ वा. महाआरती, दुपारी १ ते ३ महाप्रसाद (भंडारा) , दुपारी ३ ते रात्रौ ८ वा. हळदीकुंकू, सांय. ५.३० ते ८.३० रश्मी जाईल प्रस्तुत परंपरा ग्रुप दादर मुंबई यांचे मंगळागौरीचे पारंपरिक खेळाचे सादरीकरण होणार आहे.सांय. ३.३० ते ५.३० व ७ ते ८.३० या दरम्यानच्या कालावधीत श्री हरीपाठ मंडळ गिम्हवणे यांचा हरिपाठ तसेच दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी श्री.सिध्दी ईच्छापूर्ती गणेश मंडळ महालक्ष्मी रोड दापोली ने आयोजित केलेल्या सर्वच कार्यक्रमांना उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg