loader
Breaking News
Breaking News
Foto

वाहन तपासणीत बनावट दारूचा मोठा साठा जप्त

बांदा (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहन तपासणीदरम्यान बांदा पोलिसांनी मोठी कारवाई करत गोवा बनावट दारू व बिअरचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई आज पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास इन्सुली चेकपोस्ट येथे करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलिस अधीक्षक नयोमी साटम व उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बांदा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र पालवे, पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे यांच्यासह पोलिस कर्मचारी प्रसाद पाटील, दासू पवार, तातू कोळेकर, प्रदीप नाईक, सिद्धेश माळकर, विकी गवस, शेखर मुणगेकर व प्रथमेश पोवार यांनी ही कारवाई केली. तपासणीदरम्यान एका टँकरमधून गोवा बनावट ओल्ड मंक दारूचे ४६० बॉक्स (किंमत अंदाजे ₹४६,९२,०००) तसेच किंगफिशर बिअरचे १२० बॉक्स (किंमत ₹५,१८,४००) असा एकूण ₹५२,१०,४०० किमतीचा मद्यसाठा आढळून आला. याशिवाय संबंधित टँकर (क्रमांक GJ 12 AY 2365) अंदाजे ₹१५,००,००० किमतीचा असल्याने एकूण ₹६७,१०,४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणी आरोपी चालक जोरा निंबा राम (वय ५३), रा. भदोन की धानिय, तहसील गुडमलानी, जिल्हा बाडमेर, राजस्थान याच्याविरुद्ध बांदा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५(अ)(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक काळात बेकायदेशीर दारू वाहतुकीवर पोलिसांचा कडक नजर ठेवण्याचा इशारा यानिमित्ताने देण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

इन्सुली चेकपोस्टवर पहाटे कारवाई; ६७.१० लाखांचा मुद्देमाल हस्तगत

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg