loader
Breaking News
Breaking News
Foto

रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त खारघर येथील भव्य कार रॅलीमध्ये अबोली महिला रिक्षा संघटनेच्या सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पनवेल :- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल आणि इनर व्हील क्लब, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान, 2026 सडक सुरक्षा, जीवन रक्षा अंतर्गत आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत महिला कार, रिक्षा, बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचा उद्देश महिलांची सुरक्षितता, महिला सक्षमीकरण, रस्ता सुरक्षा याबाबत जनजागृती करणे हा आहे, तसेच महिला साठी मैत्री, मानवतावादी सेवा, महिला सक्षमीकरण व सामाजिक कल्याण यासाठी कार्य करणे, या उद्दिष्टांशी सुसंगत राहून हा संयुक्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमात विविध क्षेत्रातील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या रॅलीत अबोली महिला रिक्षा संघटनेच्या महिला सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. महिलांनी वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालना आणि जनजागृतीचा संदेश देत रॅली यशस्वी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी सीमा कांबळे, प्राचार्य, विसपुते कॉलेज ह्या लाभल्या. तसेच सदर कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन जयंत चव्हाण आणि निलेश धोटे यांचे लाभले आणि कार्यक्रमास गजानन ठोंबरे, प्रीती पवार, विजया चामे, कल्याणी सुरतकर आदी मान्यवर उपस्थीत होते. सदर रॅली चे सारथीत्वा आणि मार्गदर्शन प्रीती पवार आणि विजया चामे यांनी केले. सदर रॅली प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, खारघर सेंट्रल पार्क - उत्सव चौक - पटेल चौक - विघ्नहार - डीमार्ट - शिल्प चौक - प्रशांत कॉर्नर, सेक्टर 35 - स्वप्नपूर्ती - गुरुद्वारा - सेंट्रल पार्क,प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल, रॅलीदरम्यान सर्व सुरक्षा उपाययोजना, वाहतूक नियम व आवश्यक प्रोटोकॉलचे काटेकोर पालन करण्यात आले. रस्ता सुरक्षा संदेश देण्यात आले. रॅली साठी ट्रॅफिक महिला पोलिस, पोलीस विभागातील महिला, 25 अबोली रिक्षा चालक महिला, इतर दोन चाकी आणि चार चाकी महिला चालक यांचा समावेश होता. या रॅलीमध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी होत्या व रस्ता सुरक्षितते बाबत सामाजिक जनजागृतीचा संदेश देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

या उपक्रमाबाबत बोलताना अबोली महिला रिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत यांनी सांगितले की, महिलांनी केवळ वाहन चालवण्यातच नव्हे तर सामाजिक उपक्रमांमध्येही पुढाकार घ्यावा. रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो. रॅलीनंतर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सीमा कांबळे आणि महिलांच्या अबोली रिक्षा चालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष भगत तसेच विविध मोटार ट्रेनिंग स्कूलच्या वतीने सहभागी झालेल्या महिलांचा कार्यालयातर्फे प्रशस्तीपत्र आणि छोटीशी भेट देऊन सत्कार केला. विविध उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा करण्यात आला. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलाना कार्यालय तर्फे प्रशस्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली तसेच सुरक्षिततेचा संदेश देत रॅलीचा समारोप करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg